नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमेवर जोरदार चकमकी सुरू आहेत. पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरील हिरानगर आणि कटुआ सेक्टरमधील नागरी वस्त्यांना लक्ष्य केले जात आहे. तसंच दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्नही होत आहेत. या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे हे आज काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सीमेवरील कारवाईचा ते आढावा घेणार आहेत, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली.

दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तानकडून काश्मीरमध्ये सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. पाक सैन्याकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याची दखल घेत हे आज श्रीनगला जाणार आहे. लष्कराच्या १५ कॉर्प्सकडून सीमेवरील दहशतवाद्यांची घुसखोरी आणि काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात मोहीमा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जनरल नरवणे हे लष्कराच्या १५ कॉर्प्सला भेट देणार आहेत आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, असं वृत्त एएनआने दिलं आहे.

पाकच्या गोळीबारात दोन जखमी

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील नागरी वस्त्यांना लक्ष्य करून पाकिस्तानकडून गोळीबार, उखळी तोफांचा सुरूच आहे. मंगळवारी रात्रभर गोळीबार सुरू होता. या गोळीबारात एकाच कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत, जखमीत एका दहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. मंजाकोट सेक्टरमधील राजधानी भागात लामबाडी गावातील नाजीर हुसेन यांच्या घराचे उखळी तोफांच्या माऱ्यात मोठे नुकसान झाले असून, त्यांच्या घरातील दोन जण जखमी झाले आहेत. जखमी ७० वर्षीय रफीक खान आणि दहा वर्षांची सोनिया शबीर यांना पोलिसांनी तत्काळ राजोरी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या लष्कराने बुधवारी पुँछ जिल्ह्यातील बालाकोट, मेंढर सेक्टरमध्ये उखळी तोफांचा मारा केला. मेंढर सेक्टरमध्ये एक तोफ गोळा जवानांनी निकामी केला आहे. भारतीय लष्करानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here