ED notice to Eknath Khadse | गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य ५ कोटी ७५ लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता १० दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

 

Eknath Khadse sad
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस

हायलाइट्स:

  • ईडीचे उपसंचालक अमित भास्कर यांनी ही नोटीस जारी केली आहे
  • गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती
  • ही मालमत्ता १० दिवसांत खाली करावी
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये एकनाथ खडसे यांना त्यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा ताबा तातडीने सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या १० दिवसांमध्ये या सर्व मालमत्ता शांततेत रिकाम्या करा, असे ईडीकडून (ED) बजावण्यात आले आहे. ईडीचे उपसंचालक अमित भास्कर यांनी ही नोटीस जारी केली आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रतिबंधक कायद्यातंर्गत (PMLA) २५ ऑगस्ट २०२१ रोजी एकनाथ खडसे (Eknath Khadse), मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तझा बदलावाला आणि उकानी यांच्या वैयक्तिक तसेच संयुक्त मालकीच्या ११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या होत्या.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने एकनाथ खडसे यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली होती. या मालमत्तेचे एकूण मूल्य ५ कोटी ७५ लाख इतके आहे. यामध्ये लोणावळ्यातील बंगला, जळगावमधील ३ फ्लॅट आणि ३ मोकळ्या भूखंडांचा समावेश आहे. ही मालमत्ता १० दिवसांत खाली करावी, असे ईडीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. तसे न केल्यास कायदेशीररित्या या मालमत्ता रिकाम्या केल्या जातील, असा इशाराही ईडीने दिला आहे. तसेच संबंधित मालमत्ता विक्री किंवा हस्तांतरण करण्याची परवानगी देऊ नये, असेही नोंदणी महानिरीक्षक आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. या मालमत्तांचे २५ मे २०२२ रोजी ॲडज्युडिकेशन झाल्यानंतर ३० मे रोजी या मालमत्ता रिकाम्या करण्याची नोटीस ईडीने जारी केली. या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील.
‘चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांशी गद्दारी केली, विश्वासघात केला’, खडसेंचा हल्लाबोल
‘माझी नव्हे तुमची घरी बसण्याची वेळ आलीय’

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खानदेशात राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सातत्याने संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपच्या गिरीश महाजन यांना लक्ष्य केले होते. ‘शिवसेनेला बेडूक म्हणणार्‍या भाजप नेते गिरीश महाजन यांनी आधी स्वत: ला सुधारावे, त्यानंतर पक्षाला सुधारावे. गिरीश महाजन मला काय म्हणतील घरी बसा. गिरीश महाजन यांचीच घरी बसण्याची वेळ आता आली आहे’ असा टोला खडसे यांनी लगावला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ed notice to ncp leader eknath khadse says leave possession of properties seized by ed
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here