या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी म्हटले आहे की, अजित पवार म्हणतात GSTचे ५०% पैसे मिळाले अजून १५ हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र ५ लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या ३०/४० हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं, असे नितेश राणे यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
सगळी चर्चा GSTवर पण ठाकरे सरकारने २ वर्षात २ लाख कोटीचं कर्ज महाराष्ट्रावर लादलं आहे या विषयावर कोण बोलत नाही. २ वर्षात महाराष्ट्राला २ लाख कोटींनी गरीब करणारं सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. कर्जावर व्याज ५० हजार कोटी, कर्ज वेळेत भरणार कसं हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री सांगत नाहीत, अशी टीकाही नितेश राणे यांनी या ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १४ हजार कोटी
केंद्र सरकारकडून २१ राज्यांना ८६ हजार ९१२ कोटी रुपयांची भरपाई रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या वाटयाला सर्वाधिक रक्कम आली आहे. चालू आर्थिक वर्षात राज्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत सांभाळताना हातभार लागावा यासाठी ही भरपाई देण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात ही माहिती दिली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-मे या कालावधीसाठी या एकूण भरपाईपैकी महाराष्ट्राला १४,१४५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.