मुंबई : वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असताना एका पक्ष्याला वाचवण्यासाठी जाणं एका व्यावसायिकाच्या जीवावर बेतलं आहे. सोमवारी दुपारी अमर जरीवाला आणि त्याच्या ड्रायव्हरला एका भरधाव काळ्या-पिवळ्या टॅक्सीने धडक दिली. यामध्ये व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये जरीवाला हवेत उडून रेलिंगवर आणि नंतर कॅरेजवेवर पडले. दोघांना जवळच्या लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी जरीवाला यांना मृत घोषित केलं. त्यांचा चालक शाम कामत (४१) याच्यावर सध्या उपचार सुरू असून पोलीस या घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.

या अपघातानंतर पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हर रविंद्रकुमार जैस्वार (३८)याला अडक केली असून त्याच्यावर निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशासह महाराष्ट्रात मंकीपॉक्सचा धोका किती?; आरोग्यमंत्री म्हणतात…
खरंतर, सी-लिंकवर थांबण्याची परवानगी नाही. अशात वेग मर्यादा ८० किमी प्रतितास आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालकांनी अशा प्रकारे गाडी चालवली पाहिजे की १०० मीटर पुढे असलेल्या गोष्टी त्याला दिसतील आणि वाहनावर नियंत्रण ठेवता येईल. या प्रकरणात, टॅक्सी चालक त्याच्या वाहनावर नियंत्रण ठेवू शकला नाही. कारण, तो वेगाने गाडी चालवत होता.

कारला एका पक्षाने धडक दिल्याने व्यावसायिक सी-लिंकवर खाली उतरला असल्याची माहिती मिळत आहेत. टॅक्सी चालक जैस्वार याचीही वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी-लिंकवरील पोल क्रमांक ७६ जवळ हा अपघात झाल्याचं तपास अधिकारी पीएसआय किरण जाधव यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं?

अमर जरीवाला, अर्जुन गुकाणे (२९) त्यांच्या ड्रायव्हरसोबत मालाडला निघाले होते, त्यांनी कारवर पक्षी आदळल्याचं पाहिलं आणि ताबडतोब त्यांच्या ड्रायव्हरला कार थांबण्यास सांगितलं. जरीवाला आणि कामत पतंग तपासण्यासाठी बाहेर पडले, त्याचवेळी एका वेगवान टॅक्सीने त्यांना धडक दिली. कामत रस्त्यावर पडले, पण जरीवाला हवेत उडून सी-लिंकच्या रेलिंगवर पडले आणि नंतर रस्त्यावर पडले. दरम्यान, वरळी पोलिसांनी अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज गोळा केले आहे. गुकाणे यांचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. तर जरीवाला यांचे वडील मनीष (७५) हे अपघात प्रकरणी फिर्यादी आहेत.

मुंबईत करोना रुग्णसंख्येत अचानक वाढ का? ही कारणं समजून घ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here