heavy rain in hingoli maharashtra | वादळी वाऱ्यामध्ये एनटीसी विभागातील टेहरे हॉस्पिटल समोर मोठे झाड वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून खाली पडल्या. तसेच आझम कॉलनी भागात तीन पत्रे उडून वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटल्या तसेच सहा खांब कोसळले आहेत.यामुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.

हायलाइट्स:
- शेतातील सोलारपंपाचे नुकसान
- महाविद्यालयांवरील पाच खोल्यांवरील पत्रे उडून गेले आहेत
शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या पाच वर्ग खोल्यावरील टीन पत्रे उडून बाजूला पडली.त्यामुळे या वर्गखोल्या उघड्या पडल्या आहेत. वर्गखोल्यामध्येही पावसाचे पाणी साचले होते.या वादळी वाऱ्यामध्ये महाविद्यालयाचे सुमारे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हळदवाडी येथील गावकऱ्यांनी रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. सायंकाळी वादळी वाऱ्यात देखील उपोषणार्थी ठाण मांडून होते.या आंदोलनामध्ये महिलांचाही सहभाग होता.
अनेक ठिकाणचा वीजपुरवठा विस्कळीत
दरम्यान वादळी वाऱ्यामध्ये एनटीसी विभागातील टेहरे हॉस्पिटल समोर मोठे झाड वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटून खाली पडल्या. तसेच आझम कॉलनी भागात तीन पत्रे उडून वीज वाहिन्यांवर पडल्यामुळे वीजवाहिन्या तुटल्या तसेच सहा खांब कोसळले आहेत.यामुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर
हिंगोलीत काल भुईमुगाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे भुईमुगाचे पीक भिजल्याने नुकसान झाले.व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतीमाल टीन शेडमध्ये तर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला शेतीमाल रस्त्यावर टाकावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Web Title : pre monsoon rain heavy rain in hingoli maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network