पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड इथं आमदार महेश लांडगे यांनी भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवली होती. या शर्यतीमध्ये कोटींच्या बक्षिसांचे वाटपही करण्यात आलं. सुमारे सलग पाच दिवस या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पुण्यातून या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने बैलगाडा मालक आले होते. पण याच कार्यक्रमाला एक राजकीय रंगही आला आहे.
भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी या बैलगाडा शर्यतीसाठी हजेरी लावली होती. त्यात देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, सदाभाऊ खोत यांनी हजेरी लावली होती. मात्र, या स्पर्धेला राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी देखोल हजेरी लावली. या आमदारांची चक्क त्यांच्या कार्यकर्त्यांनी बैलगाडा घाटातूनच मिरवणूक काढली. यामुळे सुनील शेळके यांची भव्य लोकप्रियता पाहून भाजपच्या मोठ्या नेत्यांना देखील त्यांचे कौतुक करावेसे वाटले असावे.
Mumbai Covid Cases : महाराष्ट्रात वेगाने वाढतोय करोना, मुंबईतली ११ ठिकाणं आहेत हॉटस्पॉट या मिरवणुकीसाठी मोठा जनसागर बैलगाडा घाटातून वाजत-गाजत आमदार सुनील शेळके यांना खांद्यावर घेऊन नाचत होता. त्यामुळे भाजपच्या बैलगाडा घाटात हवा मात्र राष्ट्रवादीच्या आमदारने केली असेच म्हणावं लागेल. सुनील शेळके यांच्या घाटातल्या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगू लागली आहे.