कोच्चीः देशात करोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला होता. आता केरळमध्ये बुधवारी फक्त एकच नवीन रुग्ण आढळून आला. मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी ही बातमी दिली. पण ही कमाल केलीय एका मराठमोळ्या अधिकाऱ्याने. नाव आहे पोलीस महानिरीक्षक विजय साखरे. राजस्थानमधील भिलवाडा पॅटर्नची देशात चर्चा सुरू असताना आता विजय साखरेंनी केरळचा कासरगोड पॅटर्न यशस्वीरित्या राबवून दाखवलाय. यामुळे केरळमध्ये सर्वत्र चर्चा आहे ती विजय साखरे यांची. करोनाविरोधी लढाईत मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी विजय साखरेंवर विश्वास दाखवत कासरगोड मोहीमेची जबाबदारी सोपवली.

विजय साखरेंनी असे कंन्टेमेंट

केरळात सर्वाधिक रुग्ण हे कासरगोड जिल्ह्यात होते. कासरगोड हा केरळमधील करोनाचा हॉटस्पॉट बनला. तिथे एका आठवड्यात करोना रुग्णांची संख्या ३४ वरून थेट १०६ वर पोहोचली. याची दखल घेतल. कासरगोडमध्ये करोनाला अटकाव करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री पीनराई विजयन यांनी विजय साखरेंकडे दिली.

> भाौगोलिक रचना लक्षात विजय साखरे यांनी करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या कासरगोड जिल्ह्याचे सर्वप्रथम ७ कंटेन्मेंट झोन केले. प्रत्येक कंटेन्मेंट झोनचा संपर्क जिल्ह्यातील इतर भागांशी संपूर्णपणे तोडून टाकला.

> ड्रोनद्वारे पोलिसांनी नागरिकांवर नजर ठेवली. घराबाहेर पडणाऱ्या आणि लॉकडाऊन मोडणाऱ्या अनेकांना अटक केली. एवढचं नव्हेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा कडक इशारा दिला.

> कुठेही गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी व्हॉट्सअॅपवर आधारीत घरपोच सेवा सुरू केली.

> माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सशस्त्र पोलिसांसह विशेष पथकं रोज २० हजार नागरिकांची माहित घेत होते. यात परदेशातून आलेल्या अनेक नागरिकांचाही समावेश होता. घरातच क्वारंटाइन केलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेले ज्यांना लागण होण्याची शक्यता आहे अशा सर्वांची सखोल माहिती घेतली गेली.

> कोविड सेफ्टी अॅप सुरू करण्यात आले. वैद्यकीय सेवा, औषधं आणि इतर मदत कशी मिळवायची यासाठी क्वारंटाइन असलेल्या नागरिकांना अॅपवर नोंद करण्यास सांगण्यात आले.

> हे सगळं एकाबाजूला सुरू असताना दुसरीकडे मोठ्या संख्यने रुग्ण वाढल्यास त्याची तयारी करण्यात येत होती. १ हजारांहून अधिक खासगी हॉस्पिटल्स आणि रुम आणि २ हजारांहून अधिक होस्टेल आणि लॉजमध्ये करोना रुग्णांसाठी बेड तयार ठेवण्यात आले. या ठिकाणी ऑक्सिजन गॅस सिलिंडरची व्यवस्थाही केली गेली. यासोबत खासगी डॉक्टर आणि नर्सेस यांनाही सहभागी करून घेतले.

सर्व प्रयत्नांनंतर कासरगोडमध्ये एकाच आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली. या महिन्याच्या पहिल्या ९ दिवसांमध्ये ५० नवे रुग्ण आढळून आले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विजय साखरे यांनी दिली. अॅपद्वारे ३ हजार नागरिकांवर देखरेख ठेवली गेली. जर या सर्व उपाययोजना वेळेत झाल्या नसत्या आणि रुग्ण संख्या वाढीचा वेग आधी प्रमाणेच राहिला असता तर २१ एप्रिलर्यंत फक्त कासरगोडमधील रुग्णांची संख्या ३ हजारांवर गेली असती, असं विजय साखरे म्हणाले. कासारगोडमधील रुग्णांची संख्या १२ एप्रिलपर्यंत १६६ इतकी होती. त्यापैरी ६० हून अधिक जण बरे झाले आणि त्यांना घरी सोडण्यात आलंय. यानुसार साखरे यांनी मुख्यमंत्र्यांचा विश्वास सार्थ करून दाखवलाय.

देशात ३० जानेवारीला केरळच्या त्रिसूरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर राज्यात करोना रुग्णांची संख्या सतत वाढत चालली होती. करोना रुग्णांच्या संख्येत केरळ राज्य देशात पहिल्या क्रमांकावर होते. आता हेच राज्य देशात १० व्या स्थानावर आले आहे. केरळमधील करोना रुग्णांची एकूण संख्या ३८७ झाली आहे. त्यापैकी १६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर २११ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here