weather today at my location: Weather Alert : राज्यात २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागांना हवामानाचा इशारा – pre monsoon rain update rain in some places in konkan and central maharashtra today
रत्नागिरी : महाराष्ट्राला सध्या मान्सूनच्या आगमनाची प्रतिक्षा आहे. पण राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आजही हवामान खात्याकडून काही शहरांना पावासाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील अनेक जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांत सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे.
Heavy Rainfall Alert : पुढच्या ५ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा, ‘या’ राज्यांना हवामानाकडून अलर्ट दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं ४५ पूर्णांक २ अंश सेल्सिअस झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबई, पुण्यासह सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सोसाट्याचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढलं.
राज्यात पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील लगतच्या काही भागात गडगडाटासहसह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं होसाळीकर यांनी ट्वीट करत म्हटलं होतं. त्यानुसार, आज राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.