नवी दिल्लीः देशातील ७१८ पैकी ४०० जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाहीए. तिथे एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना करोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे २-३ आठवडे हे देशासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं.

करोना संसर्गाचे वृत्त येताच भारताने पटापट पावलं उचलली. करोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण चीनमध्ये ७ जानेवारीला आढळून आला होता. यानंतरर आपण ८ जानेवारीपासून तज्ज्ञांची बैठक बोलावली होती. यानंतर १७ जानेवारीला केंद्र सरकारने आरोग्यासंबंधीचे दिशानिर्देशही जारी केले.

बिहारमधील करोनाची स्थिती नियंत्रणात आहे. पण महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. खास करू मुंबईत करोनाचे रुग्ण वाढत आहे. कर्नाटकमध्येही स्थिती बिघडली आहे. पण तिन्ही राज्यांच्या सचिवांनी दाखवलेल्या विश्वासाने आम्ही समाधानी आहोत. केंद्र सरकारच्या आदेशांनुसार आसाममध्येही विदेशी दारूची सर्व दुकानं आणि बॉटलिंग प्लांट्स, डिस्टलरीज आणि ब्रुअरीज बंद राहणार आहेत, असं हर्षवर्धन म्हणाले.

दरम्यान, देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या ही ११, ९३३ पर्यंत पोहोचलीय. तर मृतांची संख्या ३९२ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here