मुंबई: पॉपस्टार शकीरा (Shakira Latest News) सध्या तित्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अशी माहिती समोर आली आहे की फुटबॉलर जेरार्ड पिक (Gerard Pique) आणि तिच्यामध्ये काही गोष्टी आलबेल नाही आहेत. २०१९ पासून हे कपल एकत्र आहे. त्यांना दोन मुलं देखील आहेत, मात्र असा दावा केला जात आहे की शकीरालाल जेरार्ड याने धोका (Shakira and her longtime boyfriend Gerard Pique) दिला आहे. या घटनेनंतर दोघे वेगवेगळे राहत आहेत. अशी देखील माहिती समोर येत आहे की दोघे लवकरच विभक्त होणार आहेत.

El Periodico journalist, Emilio Perez de Rozas च्या मते, जेरार्ड गेल्या काही आठवड्यांपासून त्याची लाँग टाइम पार्टनर शकीरापासून वेगळा राहत आहे. काही दिवसांपासून शकीराने जेरार्डला एका दुसऱ्या महिलेसह पकडले होते. प्रेमात धोका मिळाल्याने कथित स्वरुपात गायिका त्याच्यापासून वेगळी झाली आहे.

हे वाचा-Johnny Depp ने जिंकली मानहानीची केस, अंबरचं १.५ अरबचं नुकसान

जेरार्डने सोडलं आहे घर

Shakira Gerard

मीडिया अहवालात असा दावा केला जात आहे की जेरार्डने त्यांच्या घरातून त्याचं सर्व सामान गुंडाळलं आहे आणि तो बाहेर पडला आहे. त्या घरात तो शकीरासह राहत होता. सध्या तो ‘पार्टी लाइफस्टाइल’ जगत आहेत. तो दरदिवशी नाइटक्लबमध्ये जात आहे. असे म्हटले जाते की त्यांच्या नातात मोठी फूट पडली आहे. दरम्यान या सर्व दाव्यांमध्ये सत्यता किती आहे, याबाबत अद्याप संपूर्ण माहिती मिळाली नाही आहे.

हे वाचा-केके यांचा कार्डियाक अरेस्टमुळे झाला मृत्यू, लिव्हर-फुप्फुसांची होती बिकट अवस्था?

१३ व्या वर्षांपासून सुरू केले काम

Shakira 1

शकीरा कोलंबियाची एक लोकप्रिय गायिका आहे. तिला ‘क्वीन ऑफ लॅटिन म्युझिक’ देखील म्हटले जाते. तिने अवघ्या १३व्या वर्षापासून रेकॉर्डिंग करण्यास सुरुवात केली होती. तिची अनेक गाणी जगभरात प्रसिद्ध आहेत. तिचे ‘वाका वाका’ या गाण्याने भारतातही मोठी प्रसिद्ध मिळवली होती. ती गाण्याप्रमाणेच डान्सिंग स्कील्ससाठी देखील प्रसिद्ध आहे.

याआधीही तुटलं आहे १० वर्ष जुनं नातं

Shakira 2

शकीरा तिच्या कुटुंबासह

२००० साली ही पॉपस्टार Argentinian लॉयर Antonio de la Rua याच्यासह रिलेशनशिपमध्ये होती. दहा वर्ष एकत्र राहिल्यानंतर ते दोघेही विभक्त झाले होते. यानंतर तिचे आणि जेरार्ड पिक याच्यासह नातेसंबंध सुरू झाले होते. जेरार्ड तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. ‘वाका वाका’ शूटिंगदरम्यान त्यांची भेट झाली होती. २०१० च्या फीफा वर्ल्डकपचे हे अधिकृत गाणे होते.

हे वाचा-जॉनीने केला अंबर हर्ड Threesome चा आरोप, Elon Mask अडकला

दोन मुलांचे पालक आहेत जेरार्ड आणि शकीरा

Shakira 3

शकीरा आणि जेरार्ड त्यांच्य मुलांसह

२०१३ साली शकीराने तिच्या महिल्या मुलाला तर २०१५ साली दुसऱ्या मुलाला जन्म दिला. शकीरा आणि जेरार्ड यांना फोर्ब्सच्या मोस्ट पॉवरफुल कपल्सच्या यादीमध्ये देखील स्थान मिळाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here