मुंबई : राज्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे नागरिक त्रस्त आहेत. अशात आता प्रतिक्षा आहे ती मान्सूनच्या आगमनाची. पण हवामान खात्याने दिलेल्या नव्या अंदाजानुसार राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येता आठवडा हवामानाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ दिवसांसाठी महाराष्ट्रात जिल्हानिहाय तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर २-४ दिवसांत विदर्भात काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. यासंबंधी भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली आहे.

Weather Alert : राज्यात २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागांना हवामान खात्याचा इशारा

आजही हवामान खात्याकडून काही शहरांना पावासाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. कोकणातील अनेक जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांत सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं ४५ पूर्णांक २ अंश सेल्सिअस झाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबई, पुण्यासह सांगली, सातारा, मराठवाडा, विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी सोसाट्याचा पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढलं.

आयुक्तांचा ‘बेस्ट’ निर्णय; मुंबई पोलिसांना थेट मिळणार ५,२०० रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here