कोलकाता: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीने काल (बुधवारी) एक पोस्ट शेअर केली होती. गांगुलीच्या त्या पोस्टने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली होती. गांगुलीने एक नवी सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. यामुळे लोकांनी अनेक अर्थ काढण्यास सुरुवात केली. काहींना वाटले की गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राजकारणात उतरणार आहे. पण काही तासात बोर्डाचे सचिव जय शहा यांनी गांगुली राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले.

क्रिकेट विश्वात काल गांगुलीच्या पोस्टमुळे बराच गोंधळ झाल्यानंतर आता आणखी एक पोस्ट शेअर करून तो नेमके काय करणार आहे याचे उत्तर दिले आहे. गांगुलीने क्लासप्लस हे नवे शैक्षणिक अॅप लॉन्च केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत गांगुलीने या अॅपचा फायदा शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना देखील होणार असल्याचा दावा केलाय.

वाचा-

वाचा-

गांगुलीने बुधवारी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, १९९२ साली माझ्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरूवात झाली. २०२२मध्ये या घटनेला ३० वर्ष झालीत. तेव्हापासून क्रिकेटने मला खुप काही दिले आहे. यासाठी तुम्ही सर्वांनी मला पाठिंबा दिलाय. मला प्रत्येक व्यक्तीचे आभार मानायचे ज्यांनी या प्रवासात मला साथ दिली. मला आशा आहे की मी नव्या प्रवासात देखील तुम्ही असाच पाठिंबा द्याल.

वाचा-

वाचा-

सौरव गांगुलीच्या या पोस्टनंतर क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. त्याच्या पोस्टमुळे गांगुली राजीनामा देऊन राजकारणात येणार अशी चर्चा सुरू झाली. अखेर जय शहा यांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here