मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यंदा वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. तसंच त्यांच्या कारकिर्दीलाही ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं ‘अष्टविनायक’ नाट्यसंस्था आणि परिवारातर्फे अशोक सराफ यांचा त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

शनिवार, ४ जून रोजी दादरच्या शिवाजी मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता ‘व्हॅक्यूम क्लीनर’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. अशोक सराफ यांच्यासह या नाटकात अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका आहे. चिन्मय मांडलेकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे या सन्मान प्रयोगासाठी आणि सत्कार सोहळ्यासाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. त्यामुळे नाट्यरसिकांसाठी ही खास पर्वणी असेल.
Ashok Saraf Interview: लक्ष्यासोबत केलेल्या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा दर्जा घसरला? अशोक सराफ स्पष्टच बोलले
‘करोनाचा काळ वगळता गेली ४ वर्षं ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक अशोक सराफ यांच्या सहकार्यानं रंगभूमीवर जोरात सुरू असून त्याचे ३००हून अधिक प्रयोग झाले आहेत. अशोक सराफ यांच्यासारख्या सहृदयी आणि गुणी कलाकाराचा त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त सन्मान करण्याचा योग आमच्या ‘अष्टविनायक’ संस्थेच्या परिवाराला मिळतोय; हे आमचं भाग्य आहे’; असं मत या नाट्यसंस्थेचे ज्येष्ठ निर्माते दिलीप जाधव यांनी व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here