नेमकं घडलं तरी काय, पाहा…इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली. या पहिल्या दिवशीच्या पाचव्या षटकात ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने दमदार फटका लगावला. हा चेंडू चौकार जाईल, असे वाटत होते. पण त्याचवेळी इंग्लंडचा जॅक लीच हा या चेंडूचा पाठलाग करत होता. पाठलाग करत असताना जॅक हा चेंडू पकडेल, असे वाटत होते. जॅकने यावेळी चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी जॅकच्या डोक्याला जबर दुखापत झाली. ही दुखापत एवढ्या गंभीर स्वरुपाची दिसत होती की, इंग्लंडबरोबरच न्यूझीलंडच्या डॉक्टरांनीही मैदानात धाव घेतली आणि जॅकची तपासणी केली. जॅकने यावेळी चौकार अडवला खरा, पण त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्यानंतर त्याला थेट मैदानाबाहेर नेण्यात आले. या दुखापतीमुळे आता जॅक या सामन्यातून आऊट झाला आहे, दुखापतीमुळे त्याला आता हा सामना खेळता येणार नाही. जॅकच्या जागी आता इंग्लंडच्या संघात मॅथ्यू पार्किसनची निवड करण्यात आली आहे, त्याचा हा पहिलाच सामना आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव १३२ धावांत आटोपला…वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या तिखट माऱ्यामुळेच इंग्लंडला पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडला १३२ धावांत खुर्दा उडवता आला. अँडरसन आणि मॅथ्यू पॉट्स यांनी यावेळी प्रत्येकी चार विकेट्स मिळवल्या. अँडरसनच्या गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या गोलंदाजीपुढे दाणादाण उडल्याचे पाहायला मिळाले. अँडरसनने या सामन्याच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडला दोन मोठे धक्के दिले. कारण अँडरसनने न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर विल यंग आणि टॉम लॅथम यांना स्वस्तात बाद केले, या दोघांनाही प्रत्येकी एक धाव करता आली.