मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा पक्ष नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुरुवारी मशिदींवरील भोंग्यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले होते. मनसैनिकांनी (MNS) हे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मनसेला डिवचले आहे.ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी जयंत पाटील यांनी मनसेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढलं आहे, ते कुठपर्यंत पोहोचतंय त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावरून आता मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. ते जयंत पाटील यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच पत्राबाबत त्यांनी आज ट्विट करत मनसैनिकांना आदेश दिले आहेत. माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे, असे निर्देश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले आहेत.
मशिदीवरील भोग्यांविरोधातील आंदोलन यशस्वी कसं करायचं?, राज ठाकरेंचा मनसैनिकांना मंत्र

राज ठाकरेंच्या पत्रकात नेमकं काय?

१. जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.
२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.
३. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here