परभणी : जिंतूर तालुक्यातील साखरतळा येथील एका विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. जीवे मारण्याची धमकी देऊन महिलेला गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे बोलावले आणि जवळपास कोणी नसल्याची संधी साधून आरोपीने पीडितेला हाताला धरुन जबरदस्तीने शेतात ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी प्रमोद ठाकरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साखरतळा येथील एका २७ वर्षीय विवाहितेची ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान प्रमोद ठाकरे याच्याशी ओळख झाली होती. ठाकरे हा नात्यातील असल्यामुळे वारंवार घरी येत होता. मार्च २०२२ मध्ये प्रमोद ठाकरे याने सदर विवाहितेला महत्त्वाचे काम आहे, असं सांगून गावातील जि.प. शाळेच्या पाठीमागे बोलावले. जवळपास कोणी नसल्याची संधी साधून त्याने विवाहितेच्या हाताला धरुन जबरदस्तीने शेतात ओढून नेले व तिच्यावर अत्याचार केला.

गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर पंजाब सरकारने ‘तो’ निर्णय बदलला

दरम्यान, २० एप्रिल रोजी पुन्हा आरोपीने अशीच जबरदस्ती करून पीडित महिलेवर अत्याचार केला. तसंच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या प्रकारास कंटाळून सदर विवाहितेने जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरुन प्रमोद ठाकरे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) (एन) ३२३, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here