वाहनधारकांना दिलासा! पेट्रोल-डिझेल दरांबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
आज सकाळपासून भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली आहे. या तेजीनं सेन्सेक्स ६०० अंकांनी वधारला. बाजारात प्रमुख शेअरला गुंतवणूकदारांची पसंती आहे. रिलायन्सच्या शेअरसाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. आजच्या सत्रात सकाळी १०.३० वाजता रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ३.११ टक्क्यांनी वाढला. या तेजीने रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल १९,००,५४४.२० कोटी इतके वाढले.

RIL Share : रिलायन्स शेअर तेजीत
‘सर्व्हिस चार्ज’बाबत केंद्राचे मोठं विधान;रेस्टॉरंट-हॉटेलच्या मनमानी शुल्क वुसलीवर अंकुश
आज इंट्राडेमध्ये रिलायन्स इंडस्टीजचा शेअर २,८१६.३५ रुपयांपर्यंत वाढला होता. १२ मे २०२२ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २४०० रुपयांवर होता. त्यानंतर सातत्याने त्यात वाढ झाली आहे. तीन आठवड्यात तो जवळपास १२ टक्क्यांनी वाढला आहे.
दरम्यान, रिलायन्सच्या शेअरमधील तेजीनं मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत देखील मोठी वाढ झाली आहे. ‘ब्लूमबर्ग बिलिनिअर इंडेक्स’नुसार बुधवारी अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये ९.८ कोटी डॉलरची वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता ९६.१ अब्ज डॉलर्स असून ते पुन्हा एकदा आशियातील श्रीमंत उद्योजक बनले आहेत. शेअरमधील तेजीने अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. अंबानी यांची एकूण संपत्ती ९६.१ अब्ज डॉलर्स इतकी वाढली. चालू वर्षात अंबानी यांच्या संपत्तीत ६.०९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.