Rajya Sabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यामुळे मविआ नेते आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. देवेंद्र फडणवीस मविआच्या विनंतीला मान देऊन धनंजय महाडिक यांना माघार घ्यायला लावणार का, हेदेखील पाहावे लागेल.

 

Devendra Fadnavis MVA
राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न.

हायलाइट्स:

  • महाविकास आघाडीकडे उरलेल्या मतांची संख्या जास्त आहे
  • राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला संधी द्या
  • भाजपच्या उमदेवाराने राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी
मुंबई: राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीस यांच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. भाजपने राज्यसभा निवडणुकीतून (Rajyasabha Election 2022) माघार घ्यावी. त्याची भरपाई म्हणून विधान परिषद निवडणुकीत पाचवी जागा भाजपसाठी सोडली जाईल, असा हा प्रस्ताव होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हाच प्रस्ताव उलटा करावा, अशी भूमिका घेत महाविकास आघाडीला पेचात टाकले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याचा फैसला अद्याप होऊ शकलेला नाही. (Mahaviaks Aghadi offer to BJP for RajyaSabha Election 2022)

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, महाविकास आघाडीकडे उरलेल्या मतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला संधी द्या, असे आम्ही फडणवीस यांना सांगितले. त्यासाठी भाजपच्या उमदेवाराने राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, त्याची भरपाई आम्ही विधान परिषदेला करू, असे आम्ही त्यांना सांगितले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, ‘आपण हीच गोष्ट उलटी करू’. याचा अर्थ राज्यसभेच्या निवडणुकीतून शिवसेनेने माघार घ्यावी आणि विधान परिषदेत भाजप पाचवी जागा लढवणार नाही. मात्र, आजची एकूम चर्चा चांगली आणि हसतखेळत झाली. आता तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. आम्ही शेवटपर्यंत वाट पाहू, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
भाजप-मविआच्या बैठकीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला; म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस मॅच्युअर्ड नेते’
महाविकास आघाडीने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपची मदत का मागितली, असा प्रश्न यावेळी भुजबळ यांना विचारण्यात आला. यावर भुजबळ यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुका बिनविरोध होण्याची प्रथा आहे. कोणीतरी पुढाकार घेतल्याशिवाय चर्चा शक्य नव्हती. आता आम्ही देवेंद्र फडणवीसांच्या प्रस्तावाबाबत आमच्या पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा करू. आम्ही राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करू, असे भुजबळ यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajya sabha election 2022 conversation between maha vikas aghadi and devendra fadnavis
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here