अमरावती : महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत असताना अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. या परिसरातील ५० वर्षीय महिलेवर घनदाट जंगलात नेऊन ३५ वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ तयार केला. तसंच हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा पीडित महिलेचं शारीरिक शोषण केल्याचं उघड झालं आहे. अब्दुल शकील अब्दुल बशीर (३५, रा. रहेमतनगर गल्ली नंबर १, अमरावती) असं पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल शकील आणि पीडित महिला यांचा एकमेकांसोबत परिचय होता. महिलेच्या घरी कोणी नसताना शकीलने तिच्यावर काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदा बलात्कार केला. तसंच याबाबत कोठेही सांगून नकोस, अशी धमकी दिली. त्यानंतर तो वारंवार महिलेच्या घरात जाऊन तिच्यावर बलात्कार करत होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी अब्दुल शकीलने पीडित महिलेला छत्री तलाव परिसरातील जंगल भागात नेले आणि त्याठिकाणी पुन्हा बलात्कार केला. यावेळी त्याने लैंगिक अत्याचार करत महिलेचा व्हिडिओ काढला.

पुण्यात हॉटेल चालकाने उकळतं पाणी टाकून केला दोन भिकाऱ्यांचा खून; आमदाराने आरोपीला वाचवलं?

या प्रकारामुळे पीडितेने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. मात्र हाच व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी आरोपीने महिलेला दिली होती. दरम्यान २९ मे रोजी त्याने महिलेला दुचाकीवर बसवून लालखडी भागातील जंगलात नेत तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर महिलेला त्याने सोडून दिले. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे पीडितेने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्कार तसेच धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here