सोसाट्याच्या वाऱ्याने घरावरील छप्पर उडाले
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील सितापावली या ठिकाणी अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गोविंद ठाकरे यांच्या घरावरील छप्पर पूर्णपणे हवेत उडून गेल्याने घरातील धान्य आणि घरगुती वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात महत्त्वाची कागदपत्रे देखील उडून गेली आहेत. तसेच घरात असलेले सात महिन्याचे बाळ आणि आईला किरकोळ दुखापत झाली आहे.

वाऱ्यामुळे घरावरील छप्पर उडालं
हेही वाचा-६०-७० मिमी पाऊस झेलण्याची मुंबईची क्षमता, त्याहून अधिक पाऊस झाल्यास पूरस्थितीची भीती!
पंचनामा करून मदत देण्याचं आश्वासन
यावेळी संबंधित ग्रामपंचायतीच्या तलाठी कविता पारचूरे यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन पंचनामा करून मदत दिली जाणार अशी माहिती दिली आहे. ऐन पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घरावरील छप्पर उडून निवाऱ्यासाठी अडचणी निर्माण झाल्याने तत्काळ मदत मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त परिवाराने केली आहे.
हेही वाचा-PHOTO: कोल्हापूरला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले, नागरिकांची धांदल
भाजप ग्रामीणच्या कार्यकर्त्यांची मदत
नुकसानग्रस्त परिवाराची हालाखीची परिस्थिती पाहून तळोदा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण कार्यकर्त्यांच्यावतीने नुकसानग्रस्त कुटुंबाला पाच हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली आहे. महसूल विभागाने देखील कार्यवाही करून लवकर मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी गोविंद ठाकरे यांनी केली आहे.
हेही वाचा-थरकाप उडवणारा वारा, धडकी भरवणारा पाऊस, मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरकरांची दैना
जळगावमध्ये पावसाची दमदार बॅटिंग, उभ्या केळीच्या बागा झाल्या भुईसपाट