देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आतापर्यंत देशात एकूण ११ हजार ९३३ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी दिल्लीत २४ तासांत केवळ १७ रुग्ण, तर केरळमध्ये फक्त १ रुग्ण आढळला ही त्यातल्या त्यात दिलासादायक बाब. आज दिवसभरात देशभरात करोनाबाबतची काय स्थिती आहे हे जाणून घेऊ या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून…

Live अपडेट्स…

>> आग्रा येथे करोनाचे आणखी १९ रुग्ण आढळले. आग्र्यात एकूण रुग्णांची संथ्या १६७.

>> केरळ: लॉकडाउन असल्याने ऑटोरिक्षा थांबवली, पाहा, आजारी वडिलांना असे न्यावे लागले घरी.

>> दिल्लीसाठी दिलासा देणारे वृत्त, गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत आढळले फक्त १७ नवे करोनाचे रुग्ण.

>> केरळमध्ये गेल्या २४ तासांत आढळला करोनाचा फक्त १ रुग्ण.

>> देशभरात करोनाने सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले असून त्यानंतर मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात आता पर्यंत सर्वाधिक १७८ मृत्यू झाले असून मध्य प्रदेशात ५३ मृत्यू झाले आहेत. दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येकी ३० रुग्ण मृत्यू पावले असून तेलंगणमध्ये १८, पंजाबमध्ये १३, तामिळनाडूत १२, तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात मृतांचा आकडा आहे ११.

>> आतापर्यंत देशभरात करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या पोहोचली आहे ३९२ वर.

>> देशभरातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या पोहोचली ११,९३३ वर, यांपैकी परदेशी रुग्णांची संख्या आहे ७६.

>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या या लाइव्ह अपडेट्समध्ये आपले स्वागत. देशभरातील आजची करोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचत राहा लाइव्ह अपडेट्स…

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here