मुंबई: बॉलिवूडमधील स्टारकिड्समध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे अनन्या पांडे. चंकी पांडे यांची लेक. अनन्या जितकी तिच्या चित्रपटांमुळं चर्चेत असते, त्याहून अधिक ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. अनन्या तिच्या कपड्यांमुळं, तिच्या वक्तव्यांमुळं सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल झाली आहे.
अनन्याला लहानपणासूनच अभिनेत्री व्हायचं होतं, असं तिनं अनेकदा सांगितलंय. स्टुंडट ऑफ द इयर २ या चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ती मोजक्या चित्रपटांत दिसून येतेय. पण चंकी पांडे यांची लेक असले तरी, स्ट्रगल हा करावाच लागला, असं ती म्हणते. इतकंच नाही तर सुरुवातीला तिला तिच्या कमी वजणावरून लोकांनी टोमणे मारले आहेत, इतकंच नव्हे तर तिच्या स्तनांवर ही केमेंट्स केल्या होत्या. अनन्याला ट्रोल करणाऱ्यांना चंकीचं सडेतोड उत्तर,म्हणाला एक वडिल म्हणून… सिनेसृष्टीतील हा अनुभव अनन्यानं ‘द रणवीर शो’ या शोमध्ये शेअर केलाय. स्टारकिड्सना कोण काही बोलत नाही, त्यांना सहज कामं मिळतात, असा गैरसमज आहे, असंही अनन्या म्हणाली. बॉलिवूडमधील करिअरच्या सुरुवातीच्या काही दिवसांत मी सेक्सिझमचा(Sexism) चा सामना केलाय. मला ‘बूब जॉब’ (स्तनांना योग्य आकार देणं)कर, असंही सांगण्यात आलं होतं.
इतकंच नव्हे तर माझ्या जवळची लोकंही, जरा वजन वाढव, तब्येत सुधारली तर आणखी छान दिसशील असे म्हणायचे, त्यांचे हे टोमणे ऐकूण खूप वाईट वाटायचं, कोण तरी तुमच्या बॉडी पार्टवरून तुम्हाला जज करतय ही सर्वात वाईट गोष्ट होती, असंही अनन्या म्हणाली.