मुंबई: भाजपने राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: अ‍ॅक्शन मोडमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ६ जूनला वर्षा बंगल्यावर अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पाठिंबा देण्याविषयी अपक्ष आमदारांना गळ घालतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता वर्षा बंगल्यावरील बैठकीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Rajyasabha Election 2022)

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाकडेही पुरेसे संख्याबळ नाही. सहाव्या जागेवरून भाजपने धनंजय महाडिक तर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे. ही जागा जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडे साधारण ३० च्या आसपास मते आहेत. त्यामुळे उर्वरित १२ मते मिळवण्यासाठी अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
Rajyasabha Election 2022 : शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतल्यास लगेच कागदावर कॉन्ट्रॅक्ट करू: चंद्रकांत पाटील
शिवसेनेकडील पाच आमदार असे आहेत की ते एकतर छोट्या पक्षाचे असून सरकारमधे सहभागी आहेत. त्यामुळे पाच मते नक्की मिळतील. तर भाजपकडे स्वत:चे १०६, रासप १, जनसुराज्य १ आणि पाच अपक्ष मिळून असे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे उरलेल्या दहा अपक्षांची भूमिका महत्त्वाची असेल. ही मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, तो उमेदवार विजयी होईल. या दहामध्ये बहुजन विकास आघाडीचे तीन तर याशिवाय संजय शिंदे, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर ), नरेंद्र भोंडेकर, आशिष जयस्वाल, मंजुषा गावित आणि गीता जैन यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ६ जून रोजी वर्षा बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सगळ्यांशी काय संवाद साधणार, हे पाहावे लागेल.

महाविकास आघाडीकडून भाजपला सेटलमेंटची ऑफर

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सध्या महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी सकाळी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यावेळी महाविकास आघाडीकडून राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी फडणवीस यांच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. महाविकास आघाडीकडे उरलेल्या मतांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराला संधी द्या, असे आम्ही फडणवीस यांना सांगितले. त्यासाठी भाजपच्या उमदेवाराने राज्यसभा निवडणुकीतून माघार घ्यावी, त्याची भरपाई आम्ही विधान परिषदेला करू, असे आम्ही त्यांना सांगितले.

भाजप-मविआच्या बैठकीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here