पिंपरी : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कंटेनरने धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. किवळे- देहूरोड परिसरात ही घटना घडली आहे.
दरम्यान, या भीषण अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. दुर्घटनेत एकाच वेळी मायलेकीने जीव गमावल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
बाईकला ओव्हरटेक करायला गेला अन् कार डिव्हायडरला धडकली, पाहा अपघाताचा थरार