केके यांच्या निधनामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. केके यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कॉन्सर्टमधील जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. केके यांच्या कार्यक्रमाला झालेली गर्दी हटवण्यासाठी फोम स्प्रे वापरण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. नेगात असताना ते घामाने भिजले होते. ते वारंवार घाम रुमालानं पुसतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
तर केकेंचा जीव वाचला असता! पोस्टमॉर्टम अहवालातून महत्त्वाची माहिती समोर
तसंच एसीची तक्रारही करताना ते दिसत होते. हे सगळं पाहून त्यांच्या चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ममता बॅनर्जी सरकावरदेखील विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे अभिनेता ओम पुरी (Om Puri) यांची पूर्वाश्रमिची पत्नी नंदिता पुरी (Nandita Puri) केके यांच्या मृत्यूने कमालीच्या संतप्त झाल्या आहेत. नंदिता यांनी केके यांच्या मृत्युची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच कोलकाता इथल्या लाईव्ह कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दलही प्रश्न उपस्थित केले आहेत.

काय म्हणाल्या नंदिता पुरी
ओम पुरी यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी नंदिता पुरी यांनी सोशल मीडियावर त्यांच्या रागाला वाट करून दिली. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत कोलकाता इथल्या लाईव्ह कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहिलं की, ‘पश्चिम बंगाल राज्याला लाज वाटली पाहिजे. कोलकातानेच केके यांची हत्या केली आणि आता सरकार ते झाकण्याचा प्रयत्न करत आहे. नजरुला मंचावर कोणतीही सुरक्षा नव्हती. १ हजार ५०० लोकांच्या क्षमतेच्या या स्टेडिअमवर ७ हजार लोक होते. एसी कार्यरत नव्हता. केके घामानं थबथबले होते. त्यांनी चारवेळा याबद्दल तक्रार केली.पण त्यांचं कुणीच ऐकलं नाही. ना त्यांना कुणी औषध दिलं, ना कुणी फर्स्ट एड.. या सर्व गोष्टींची सीबीआय चौकशी व्हायला हवी. तोपर्यंत बॉलिवूडनं पश्चिम बंगालमध्ये परफॉर्मन्सवर बहिष्कार घालायला हवा.’
‘जिंदगी उतनी ही है, जितनी KK को मिली’, गायकासाठी चाहत्याने लिहिलेलं हे पत्र नक्की वाचा
दोन दिवस केके होते कोलकात्यात
केके यांचा कोलकातामध्ये दोन दिवस लाईव्ह कॉन्सर्ट होते. ३१ मे रोजी संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत नजरुल स्टेडिअमवर त्यांचा कार्यक्रम होता. त्याचवेळी केके यांची तब्येत बिघडल्यानंत त्यांना रुग्णालयता नेण्यात आले. परंतु वाटेतच त्यांचं निधन झालं. केके यांनी छातीत दुखत असल्याची आणि अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. केके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमाही दिसल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची अनैसर्गिक अशी नोंद केली. त्यानंतर त्यांनी चौकशीला सुरुवात केली आहे. केके यांच्या निधनानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्या पाहून चाहत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.