मजुरी करणाऱ्या महिलेच्या दीड वर्षीय मुलीचं अपहरण झालं होतं. पोलिसांनी अवघ्या काही तासांत चिमुरडीला शोधलं. लेक पुन्हा कुशीत विसावताच आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कृतज्ञतेच्या भावनेनं तिनं पोलिसांचे पाय धरले, आभार मानले.

हायलाइट्स:
- हरवलेली लेक सापडताच आईला अश्रू अनावर
- लेक पुन्हा कुशीत येताच आई आनंदली
- पोलिसांच्या पाया पडून कृतज्ञता व्यक्त
मजुरी करणाऱ्या अनिताकुमारी भारती या कामावर गेल्या असताना त्यांची दीड वर्षीय मुलगी सुमियाचे अपहरण झाले होते. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून अपहृत मुलीचा तपास करत असतांना अंबड पोलिसांच्या पथकाने सापळा रचत संशयिताला अटक केली आणि त्याने ज्या ठिकाणी दीड वर्षाच्या मुलीला ठेवले होते तेथून तिची सुखरूप सुटका केलीय. या मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. संशयिताने दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यामागे नेमके कारण काय व त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा आता पोलीस शोध घेत आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
मुलीचं अपहरण पोलीस नाशिक न्यूज क्राईम न्यूज अपहरण झालेली मुलगी सापडली police nashik news kidnapped girl found kidnapped girl crime news
Web Title : nashik police find out missing girl in just few hours reunites with mother
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network