मुंबई: काही टीव्ही मालिका अशा आहेत, ज्यांनी वर्षानुवर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. काही मालिकांनी निरोप घेतल्यानंतरही त्या प्रेक्षकांच्या मनात आहेत. एखाद्या मालिकेत काम केलं, काही वर्षे ती मालिका सूरू राहिली की, ते एक कुटुंब तयार होतं. त्यातील कलाकार-तंत्रज्ञांमध्ये एक वेगळंच नातं निर्माण होतं.

मालिकेनं निरोप घेतल्यानंतरही अनेक वर्षांनी मालिकेमुळं तयार झालेलं हे कलाकारांचं एक कुटुंब एकमेकांना आनंदाच्या क्षणी भेटत असतं. असाच आनंद घेतला असंभव या मराठी मालिकेतील कलाकारांनी. असंभव ही मालिका आजही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे. ही मालिका संपून आता १२ वर्षे उलटली आहे.

बारा वर्षानंतर या मालिकेतील कलाकारांची नुकतीच पुनर्भेट म्हणजेच रियुनियन झालं आहे. या रियुनियनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


मराठी मालिकांमध्ये आलाय हा नवीन ट्रेंड; तुम्हाला पटतोय का?

अभिनेत्री उर्मिला कोठारे हिनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘ आठतोय का आम्ही…??? असंभव रियुनियन ते देखील तब्बल बारा वर्षांनी… हे सगळं घडवून आणल्याबद्दल शर्वरी पाटणकर तुझे आभार. खूप हसलो. शूटिंगचे किस्स, गंमती आठवल्या…असं उर्मिलानं म्हटलं आहे.

‘असंभव’ या मालिकेनं एक काळ गाजवला होता. सतीश राजवाडे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं होतं. चिन्मय मांडलेकरनं या मालिकेचे लेखन केलं होतं.

कलाकारण कोण होते?
या मालिकेत दिग्गज कलाकारांची मोठी फौज होती. मानसी साळवी, ऊर्मिला कानेटकर, उमेश कामत, नीलम शिर्के, सुनील बर्वे, आनंद अभ्यंकर, सुहास भालेकर, अशोक शिंदे, मधुराणी प्रभुलकर, या कलाकारांच्या असंभव मालिकेत प्रमुख भूमिका होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here