Pankaja Munde | गेल्या अडीच वर्षांमध्ये भाजपने तुम्हाला विधानपरिषदेत जाण्याची संधी का दिली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी म्हटले की, मी संधीची अपेक्षा करत नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. मी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. ती माझी प्रवृत्तीच नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

 

हायलाइट्स:

  • परळीतील काहीजण हे धनंजय मुंडे यांना मानतात
  • काहीजणांना माझं नेतृत्त्व मान्य आहे
  • समाजात दोन्ही प्रवृत्तीची लोकं असतात
बीड: परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि मला दोघांनाही मानणारा वर्ग आहे. आमच्या ताकदीमध्ये फार फरक नाही. फरक आहे तो आमच्या प्रवृत्तीमध्ये. माझे कार्यकर्ते हे ‘सोबर’ आहेत, तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे कार्यकर्ते हे दबंग आहेत. ते ‘मसल पॉवर’चा वापर जास्त करतात, असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले. त्या शुक्रवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. (BJP leader Pankaja Munde at Gopinath Munde death anniversary event in beed)

यावेळी पंकजा मुंडे यांना परळी मतदारसंघात तुमचे अधिक वर्चस्व आहे की धनंजय मुंडे यांचे वर्चस्व जास्त आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, परळीतील काहीजण हे धनंजय मुंडे यांना मानतात. तर काहीजणांना माझं नेतृत्त्व मान्य आहे. समाजात दोन्ही प्रवृत्तीची लोकं असतात. धनंजय मुंडे आणि मी एकत्र होते तेव्हाही आमच्याविरोधात ताकदवान प्रवृत्ती होत्या. अगदी गोपीनाथ मुंडे असतानाही त्यांच्याविरोधात असणाऱ्या लोकांना चांगली मते पडायची. धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडल्यावर मुंडे विरोधकांपैकी बराच मोठा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला. त्यामुळे सद्यस्थितीत धनंजय मुंडे आणि माझ्या ताकदीमध्ये फार फरक नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे झाल्या वाढपी, गोपीनाथ गडावर भाविकांना आग्रहाचं जेवण
यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय यांच्या कार्यकर्त्यांबद्दलही भाष्य केले. आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिमा ही चांगली आहे. तर धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते हे दबंग प्रवृत्तीचे असून ते राजकारणात ‘मसल पॉवर’चा वापर करतात, असे पंकजा यांनी म्हटले. गोपीनाथ मुंडे साहेब असताना धनंजय हे विधानपरिषदेचे आमदार झाले, त्यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्षपद होते. त्यांच्याभोवती मुंडे साहेबांचे सुरक्षाकवच होते. आज ते कोणत्याही पक्षात असले तरी त्यांना या सुरक्षा कवचाचा फायदा होत असेल, असेही पंकजा यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : bjp leader pankaja munde takes a dig at ncp mla dhananjay munde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here