विमानतळांवर आणि विमानांमध्ये विमान कर्मचाऱ्यांनी मास्क घालायला हवेत. हात स्वच्छ ठेवायला हवेत. कर्मचारी नियमांचं पालन करतात की नाही ते पाहण्याची जबाबदारी डीजीसीएची आहे. विमान प्रवासादरम्यान नियम मोडणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा नोंदवायला हवा. त्यांचा समावेश नॉन फ्लाय यादीत करायला हवा, असं न्यायमूर्ती म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच कोविड टास्क फोर्सची बैठक घेतली. लोकांनी मास्कचा वापर करायला हवा. लस घेतली नसल्यास ती घ्यायला हवी. नियमांचं पालन करायला हवं. लोकांना लॉकडाऊन नको असेल, तर या गोष्टी कटाक्षानं करायला हव्यात, असं आवाहन ठाकरेंनी केलं.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ४ हजार ४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. ३ महिन्यांत पहिल्यांदाच देशात एका दिवसात ४ हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांत १० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तर २ हजार २६३ जण कोरोनामुक्त झाले.