मुंबई : मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यंदा वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारऱ्या अशोक मामांचा चाहता वर्ग देखील तितकाच मोठा आहे.
घरातील सर्वांचेच ते लाडके अभिनेते असतात. आजी-आजोबा, आई-बाबा आणि आता तरुणांमध्येही अशोक सराफ यांची क्रेझ आहे. आजही त्यांचे सिनेमे ओटीटीवर पुन्हा पुन्हा पाहणारा तरुणवर्ग मोठा आहे.
अशोक मामा तरुणांना त्यांच्या आणखी जवळचे वाटतात त्याचं आणखी एक कारण म्हणजे, त्यांचे व्हायरल होणारे मीम्स. अशोक सराफ यांच्या काही जुन्या चित्रपटांमधील सीन मीम्ससाठी वापरण्यात येत आहेत. त्याचे हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. त्यामुळं अशोक मामा नेटकऱ्यांमध्येही तितकेच लोकप्रिय आहेत.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखीत अशोक सराफ मीम्सवरही व्यक्त झाले. सोशल मीडियावरील मिम्सबाबत ते म्हणाले, ‘माझ्या चित्रपटांतले संवाद, गाणी याचे मिम्स बनवून पसरवले जातात, ते पाहून, करणाऱ्यांना हे सुचतं कसं, याचं आश्चर्य वाटतं. किती सुंदर एडिट करतात ते. खरंच कौतुकास्पद आहे.’