सांगली : बोअरवेल ट्रक आणि एका छोटा हत्ती टेम्पो गाडीमध्ये समोरा-समोर धडक होऊन गुरूवारी भीषण अपघात झाला. ज्यामध्ये दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी आहे. आटपाडी तालुक्यातील विभुतवाडी येथील कराड-पंढरपूर महामार्गावर हा भीषण अपघात झाला. अपघातातील मृत सातारा जिल्ह्यातील कोरगावचे आहेत.

विभूतेवाडी येथील कराड-पंढरपूर महामार्गावर भीषणी अपघात…

आटपाडीच्या विभूतेवाडी येथील कराड-पंढरपूर महामार्गावर दोन वाहनांमध्ये गुरुवारी रात्री १२ च्या सुमारस भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. गणेश फडतरे आणि महेश फडतरे राहणार कोरेगाव. जिल्हा सातारा, असं अपघातातील मृतांची नाव आहेत. तर निशांत फडतरे राहणार कोरेगाव असं जखमीचे नाव आहे. जखमीला सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फडतरे यांचे शेतकरी कृषी यंत्र नावाचे दुकान आहे. त्यांचे साहित्य पोच करण्यासाठी ते आटपाडी भागात आले होते. दरम्यान माल पोच केल्यानंतर आपल्या टेम्पोतून तिघेजण परत पंढरपूर-कराड महामार्गावरून कोरेगावकडे निघाले होते.

विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; हायकोर्टाचे आदेश
उपाचारासाठी घेऊन जाताना मृत्यू…

यावेळी विभूतेवाडी याठिकाणी पोहचले असता पुलाच्या जवळ वळणावर त्यांची छोटा हत्ती टेम्पो आणि भरधाव बोअरवेल ट्रकची समोरा-समोर धडक झाली. या आपघातानंतर ग्रामस्थांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दखल केले ज्यामध्ये मायणी येथे उपचारासाठी घेऊन जाताना महेश फडतरे यांचा मृत्यू झाला. तर आटपाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना गणेश फडतरे यांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता यामध्ये बोअरवेलचा ट्रक धडक देऊन रस्त्यावर पलटी झाला. तर टेम्पोचा दर्शनी भागाचा अक्षरश: चक्काचुर झाला होता.

Prithviraj Release : कसं होणार? पृथ्वीराजच्या अॅडव्हान्स बुकिंगला थंड प्रतिसाद
Smartphone Offers: अशी संधी पुन्हा नाही! अवघ्या ४०० रुपयात खरेदी करा बेस्टसेलर स्मार्टफोन्स, बँक-एक्सचेंज ऑफरचा मिळेल फायदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here