मुंबई : सोशल मीडियावर प्रसिद्ध, नेहमी अतरंगी फॅशननी टीकेचं लक्ष्य होणारी उर्फी जावेद. तिचे चाहतेही खूप आहेत. बिग बाॅस ओटीटी फेम उर्फी जावेद तितकीच फटकळही आहे. ती कोणाचं ऐकून घेत नाही. पण आता ट्रोलर्स तिच्याबद्दल जे बोललेत ते खूपच वाईट आहे. इन्स्टाग्रामवर आलेल्या वाईट कमेंट उर्फीनं आपल्या स्टोरीत शेअर केल्या आहेत. ट्रोलर्स जे म्हणाले, ते भयानकच आहे.

‘कभी खुशी कभी गम’चा छोटू आता करणार ‘इश्क विश्क’, जिब्रानचे फॅन्स खूश

उर्फी जावेदला ट्रोलिंगचा नेहमीच सामना करावा लागतो. यावेळी मात्र ट्रोलर्सनं लिहिलंय, ‘ही जगातून गेली असती, तर बरं झालं असतं. पण फालतू लोकांना तो काही वर बोलवत नाही. मिस यु सिद्धू भाई.’ दुसऱ्यानं लिहिलंय, जी गोळी तुला लागायला हवी होती, ती मूसावालाला लागली. आणखी एक म्हणतो, मूसावालाऐवजी तूच का नाही गेलीस? उर्फीचा कमेंट बाॅक्स अशाच कमेंटनी भरून गेलाय.

उर्फी पोस्ट

उर्फी जावेदनं ट्रोलर्सना उत्तर दिलं आहे. ती म्हणते, कोणाच्या मृत्यूचा आणि माझा संबंध नाही. पण लोक ज्या पद्धतीनं माझ्याबद्दल बोलतायत ते भयानक आहे.’ उर्फीनं पुढे लिहिलं आहे, मला गेले काही दिवस असेच कमेंट मिळतायत.आपण किती निर्दयी जगात राहतोय. पण एक नक्की माझ्या मरणाची इच्छा कितीही करा. मी कुठेच जाणार नाही. इथेच राहणार.’

उर्फीची फॅशन वगैरेवर टीका करणं ठीक. पण अशा पद्धतीनं कमेंट करणं हे खरोखर भयावह आहे. सुसंस्कृत व्यक्ती असा विचार करू शकत नाही.

उर्फी जावेद सोशल मीडियावर कमालीचं वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे. उर्फी जावेदच्या वडिलांचं नाव Ifru जावेद असं आहे. तर आईचं नाव जाकिया सुल्ताना आहे. उर्फीचे आई-वडील अनेक वर्षंपासून वेगळे झाले आहेत. उर्फी, तिची आई आणि बहिणी एकत्र राहत नाही. उर्फीला दोन बहिणी असून त्यांची नावं असफी, डॉली जावेद आहेत. उर्फीचं लग्न झालेलं नाही. तसंच तिनं तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल कमालीची गुप्तता बाळगली आहे.

‘हाउसफुल्ल ५’ मध्येही अक्षय कुमारची जागा घेणार कार्तिक आर्यन?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here