धुळे शहरातील सावकार राजेंद्र बंब याच्याकडे आज तिसऱ्या दिवशीही मोठे घबाड सापडले आहे. कोट्यवधींची रोकड, अनेक किलो सोने, चांदी, संपत्ती कागदपत्र सापडली यामध्ये विशेषतः विदेशी चलनही पोलिसांच्या हाती लागले आहेत. तपास यंत्रणांनी आज एका बँकेत सहापैकी पाच लॉकर तपासले त्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा कोंबलेल्या सापडल्या.
सलग तिसऱ्या दिवशी संपत्ती मोजणी सुरूचं…
आज तिसऱ्या दिवसाच्या चौकशीत ५ कोटी १३ लाख ४४ हजार ५३० रूपये रोकड सापडली असून १० किलो ५६३ ग्रॅमचे रक्कम ५ कोटी ५४ लाख रुपयांचे सोने जप्त केले. ७ किलो ६२१ ग्रॅम चांदी रक्कम ५ लाख १४ हजार ९११ रुपयाची जप्त करण्यात आली आहे. यात सोन्याचे बिस्कीट ६७, एक किलोचा टोल, ३ किलो सोने गहान तब्बल मुद्देमाल आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतला आहे. राजेंद्र बंबच्या राष्ट्रीयकृत बँकाचे खात्याची देखील होणार चौकशी आहे. ३ दिवसांपासून तपास यंत्रणा राजेंद्र बंबच्या संपत्ती मोजत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही नोटा मोजूनही संपत्तीचा थांगपत्ता लागत नसल्याने सर्वच चक्रावले आहेत.
उद्या राष्ट्रीयकृत बँक आणि काही पतसंस्था यांची चौकशी…
गेल्या तीन दिवसात राजेंद्र बंब यांच्या नामे बेनामी संपत्ती असलेले १५ कोटी रुपयांचा मुद्देमाल आतापर्यंत पोलिसांच्या हाती लागले आहे. उद्या देखील राष्ट्रीयकृत बँक आणि काही पतसंस्था यांची चौकशी होणार आहे. त्यामध्ये अजून पोलिसांना किती घबाड हाती लागतं ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.