नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. नाईक यांनी मध्यरात्री १ वाजता आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. कामगारांबद्दल आस्था असणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारा नेता गमावल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसंच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले. नाईक यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम, घाट रोड नागपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जातील.

पहिल्या दिवशी सव्वा कोटी, दुसऱ्या दिवशी ३ कोटी, तिसऱ्या दिवशी १० कोटींचं घबाड, Lic किंगची अफाट ‘माया’?

नैतिकता आणि हरिभाऊ नाईक

हरिभाऊ नाईक हे आपल्या नैतिक मूल्यांसाठी ओळखले जात. त्यांनी १९७१ मध्ये महापौर असताना काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्षाच्या गटातील उमेदवाराचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने नैतिकता जपण्यासाठी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. ज्या पक्षाचे व त्याला पाठिंबा देणाऱ्या गटाचे मी नेतृत्त्व करत आहे, त्याच गटातील उमेदवाराबाबत दगाफटका होत असेल तर सत्तेत राहण्याचा अधिकार उरत नाही म्हणून मी पाऊल उचललं, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

केके यांच्या निधनाचा सगळ्यांनाच धक्का; बॉलिवूडमधून श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here