मुंबईसह अनेक उपनंगरामध्ये मान्सूनपूर्व पावसाची रिमझिम झाली. यंदा पाऊस सामान्य राहण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणामुळे मुंबईच नाही तर जगाला कधी तीव्र उष्णता, कधी अवकाळी पाऊस, कधी प्रचंड थंडी किंवा बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईत कसा असेल पाऊस?
गेल्या काही वर्षांत पाऊस पाहिला तर त्याचं स्वरूप बदललं आहे. पूर्वी सामान्य पाऊस पडायचा पण आता गेल्या काही वर्षांत एकाच दिवसात किंवा काही तासांत धुवांधार पाऊस होतो. त्यामुळे यंदा मुंबईत कसा पाऊस असेल याचा काही अंदाज लावता येत नाही. पण वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे मान्सून जवळ येताच लोकांची धाकधूकही वाढते.
ग्लोबल वॉर्मिंगमुळे मान्सून बदलला….
इतर राज्यांमध्ये आणि मुंबईत हवामान बदलाची वेगवेगळी कारणे असू शकतात. मुंबईतील वाढता उत्पादन उद्योग, कमी होत जाणारी जंगलं, जलप्रदूषण, लोकसंख्या ही प्रमुख कारणं असल्याचं अनेक अहवाल सांगतात. मुंबईतील काही भागात उष्णतेचं प्रमाण सध्या वाढ आहे, तर काही ठिकाणी थंडी वाढ आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे, उद्योगधंदे वाढले आणि हिरवळ कमी झाली, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे संतुलन राखूनच, सर्वकाही संतुलित होईल.
या सर्व कारणांमुळे राज्यात सध्या मोठ्या हवामान बदलांना सामोरं जावं लागतं. अशात मुंबईसारख्या शहरांमध्ये मान्सूनमुळे लोकांची मोठी हानी होते. त्यामुळे यंदाचा मान्सून १० जूनपर्यंत दाखल झाला तर यासाठी प्रशासनाने नागरिकांनाही अलर्ट केलं आहे.