अमरावती : अचलपूर येथील एका घरात तब्बल तीन सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून दोघांना किरकोळ जखम झाली आहे. भीषण स्फोटामुळे घराचे दार आणि खिडक्या तसंच घरात ठेवलेल्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. सार्मासपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सवाईपुरा येथे ही घटना घडली.
दरम्यान, या घटनेने सवाईपुरा परिसरात मोठी खळबळ उडाली. स्फोटाबाबत माहिती मिळताच पोलीस आणि तहसील विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.