मागील महिनाभरात तीव्र उन्हाळ्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. ज्यामुळे टोमॅटोची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याचे व्यावयासिकांचे म्हणणे आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेने महाराष्ट्रासह, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील टोमॅटोच्या पिकाला मोठा फटका बसला होता.
उत्पादनातील प्रचंड घट आणि मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा यामुळे मागील महिनाभरात टोमॅटोच्या किंमतीत सरासरी ७० टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात टोमॅटोच्या दरात तब्बल १६८ टक्के वाढ झाल्याचे अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीवरुन दिसून येते. मुंबईतील प्रमुख भाजी मंडईंमध्ये गेला आहे. दादर भाजी मंडईत टोमॅटोचा एक किलोचा भाव ८० ते १०० रुपये किलोच्या दरम्यान आहे. टोमॅटोच्या शंभरीने ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे डोळे पांढरे झाले आहेत.
नुकताच घरगुती गॅस सिलिंडचा भाव १००० रुपयांवर गेला होता. तर गेल्या महिन्यात पेट्रोल १२२ रुपयांवर आणि डिझेल १०५ रुपयांवर गेला होता. त्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कपात केली. पाठोपाठ राज्यात इंधनावरील व्हॅट कमी झाला होता. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचा भाव कमी झाला. सध्या मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १११.३५ रुपये इतका आहे. मुंबईत आज एक लीटर डिझेलचा ९७.२८ रुपये इतका आहे.
दोन आठवडे लागणार
केंद्रीय अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी टोमॅटोच्या महागाईस दक्षिण भारतातील उत्पादनात घसरण कारणीभूत असल्याचे म्हटलं आहे. उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस असा लहरी हवामानाने टोमॅटो पिकाला मोठा फटक बसला असे पांडे यांनी सांगितले. दरम्यान, येत्या दोन आठवड्यात टोमॅटोच्या किंमती कमी होतील, असे त्यांनी सांगितले.
…तर चटपटीत खाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागतीलपावभाजी तसेच ब्रेकफास्टसाठी टोमॅटो हा महत्वाचा घटक आहे. कांदा, टोमॅटो, कोथंबीर महागली की यावर आधारिक चटपटीत खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ होते. आता टोमॅटोने शंभरी गाठल्याने हॉटेल व्यावसायिक आणि छोटे फास्टफूड विक्रेत्यांकडून नुकसान भरुन खाद्यपदार्थांची भाववाढ केली जाण्याची शक्यता आहे.