मुंबई :भाजप आणि महाविकास आघाडीनेही सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निवडणुकीवरून भाजपला जोरदार आव्हान दिलं असून राज्यसभेची सहावी जागा आम्हीच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘सहाव्या जागेसाठी भाजप हा अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांची मते मिळवण्यासाठी भाजप त्यांना आमिष, प्रलोभने दाखवत आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. हा दबाव कशा प्रकारे आणला जात आहे, याची माहिती रोज आमच्यापर्यंत येत आहे. कारण भाजपकडून ज्यांच्यावर दबाव आणला जात आहे, ते आमचे मित्रच आहेत. या सगळ्यातून भाजपचं खरं चरित्र राज्यातील जनतेसमोर येत आहे. मात्र काहीही झालं तरी सहाव्या जागेसह राज्यसभेच्या एकूण चार जागा आम्हीच जिंकणार आहोत. त्यामुळे भाजपने त्यांचा पैसा वाया घालवू नये,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

कारला अचानक लागली आग, दरवाजाही होता लॉक; पुण्यातील इंजिनिअरचा होरपळून मृत्यू

केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराचा आरोप करत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समर्थ नेतृत्व आहे. आम्ही निवडणुका काही आता पहिल्यांदाच लढत नाही. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत. विधानसभा, विधानपरिषदा, महापौर अशा निवडणुकांचा आम्हाला सर्वाधिक अनुभव आहे. फक्त आमच्या हातामध्ये ईडी नाही. ईडी आणि सीबीआय तुमच्या हातामध्ये आहे. मात्र सरकार म्हणून इतर अनेक गोष्टी आमच्या हातात आहेत, हे लक्षात घ्या,’ असा इशाराही राऊत यांनी भाजपला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here