मसाबानं इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये आपला जुना फोटो शेअर केला आहे. त्यात तिचा साइड फेस दिसतोय. त्यावर बरीच मुरमं आलीयत. चेहऱ्यावर खड्डेही आहेत. तिनं त्यावर लिहिलं, ‘तुम्ही १२ वर्षांच्या मुलीला काय सांगाल? जी रात्री अचानक चेहऱ्यावर आलेले पिंपल्स पाहून अनेक वर्ष आरशात बघू इच्छित नव्हती. तरीही ती जगली.’
बँकेत केली १० वर्ष नोकरी, मराठी सिनेमांना असे मिळाले ‘अशोक मामा’
मसाबा बोलली चेहऱ्यांवरच्या मुरमांवर
मसाबानं सांगितलं की या कठीण परिस्थितीतून बाहेर यायला आईनं कशी मदत केली ते. ती पुढे लिहिते, ‘माझ्या आईनं मला विश्वास दिला की मी राणी आहे. ‘ मसाबानं २०१७मध्येही अशाच पद्धतीचा फोटो शेअर करून लांबलचक पोस्ट लिहिली होती.

मसाबा घरातून निघताना ही गोष्ट करायचीच
फॅशन डिझायनर मसाबा गुप्तानं लिहिलं आहे, ‘ माझ्या चेहऱ्यावर पूर्वी खूप पिंपल्स असायचे. गालावर, कपाळावर काळे डाग. पाहताना वाटायचं कुणी सिगारेटचे चटकेच दिलेत. घरातून निघताना पावडर लावल्याशिवाय मी निघायची नाही. कॅमेऱ्यासमोरही चेहऱ्यावर लाइट्स टाकायला मना करायचे.’
सध्या चर्चेत असलेली माॅडर्न लव्ह मुंबई या वेब सीरिजमध्ये ध्रुव सहगलच्या कहाणीत मसाबा होती. मसाबा मसाबा या नेटफ्लिक्स सीरिज दुसऱ्या सीझनमध्येही मसाबानं काम केलंय.
अनुषा दांडेकर झाली आई! अभिनेत्रीच्या या गोड सरप्राइजने चाहते गोंधळले 91895462