नीना गुप्ताची लेक मसाबाला १२व्या वर्षी आरशात बघायचंच नव्हतं
सुहाना खाननं तिच्या इन्स्टाग्रामवर ५ ते ६ फोटो शेअर केले आहेत. तिचं गोड स्मित आणि स्टाइल याची सगळ्यांना भुरळ पडत आहे. या नव्या फोटोत सुहाना ब्लॅक क्राॅप टाॅप आणि ब्लू जिन्समध्ये आहे. त्यात तिच्या केसांची स्टाइल आणि फिगर पूर्ण दिसत आहे.
सुहाना खानसोबत जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूरही दिसतेय. द आर्चीज सिनेमात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, खुशी आणि सुहाना एकत्र बाॅलिवूड पदार्पण करतील. झोया अख्तरच्या या सिनेमात वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंदा हेही कलाकार आहेत. सिनेमाची टीझर समोर आला आहे. पुढच्या वर्षी नेटफ्लिक्सवर हा सिनेमा रिलीज होईल.

सुहाना खान फिटनेसचीही काळजी घेत आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या योग ट्रेनरनं ती काकासन करत असलेले फोटो शेअर केले होते. सुहाना खान नियमित योगासनं करते. हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला शाब्बासकी दिली. या वयात सुहाना योग करतेय, हे पाहून फॅन्स खूश झाले. एका चाहत्यानं लिहिलं, ‘खूप छान. बघून चांगलं वाटलं. सुहाना तू पुढे जा.’ दुसऱ्या एका युझरनं म्हटलं, तू खूप मेहनत करते आहेस. तुझ्यात तुझ्या वडिलांचेच जिन्स आहेत ना. तू भविष्यातली शायनिंग स्टार आहेस.
सहाराची ‘मदर’ नाही तर ‘गॉड मदर’ आहे अनुषा दांडेकर
नवीन घरात अभिजित आणि सुखदाचा गृहप्रवेश