मुंबईत आज एक लीटर डिझेलचा ९७.२८ रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेल ८९.६२ रुपये आहे. चेन्नईत एक लीटर ९२.२४ रुपये इतका असून कोलकात्यात डिझेलचा भाव ९२.७६ रुपये इतका आहे. बंगळुरुमध्ये ८७.८९ रुपये इतका असून चंदीगडमध्ये डिझेलचा भाव ८४.२६ रुपये इतका आहे.
केंद्र सरकारने पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपये उत्पादन शुल्क कपात केली होती. त्यानंतर महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओदिशा या राज्यांनी मूल्यवर्धीत करात कपात केली होती.
जागतिक पातळीवर मात्र कच्च्या तेलाच्या भावात घसरण सुरु आहे. शुक्रवारी ब्रेंट क्रूडचा भाव ७ सेंट्सनी घसरला. तो ११७.६८ डॉलरवर स्थिरावला होता. क्रूडचा भाव २.८९ टक्क्यांनी घसरला असून तो ११६.८८ डॉलर इतका स्थिरावला होता. रशिया आणि युक्रेन युद्धानंतर युरोपीय संघाने रशियावर निर्बंध घातले आहेत. या युद्धाने कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.