जालना : पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडिओ क्लीप माहेरच्या लोकांना पाठवल्याच्या रागातून पत्नीच्या तोंडात लिंबू कोंबून तिचा खून केल्याचा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील हसनाबाद इथं ही घटना घडली. २२ वर्षीय नुसरत इम्रान कुरेशी असं मयत विवाहित महिलेचं नाव आहे. या महिलेचा खून केल्या प्रकरणी तिचा पती इम्रान महेमुद, सासू, सासरा, नणंद, नंदई यांच्या विरोधात हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Covid Cases : मुंबईत २४ तासांत करोनाची ७६३ नवी प्रकरणं, ‘हे’ ठिकाण ठरलं हॉटस्पॉट
भोकरदन तालुक्यातील हसनाबादमधील कुरेशी मोहल्ला भागात राहत्या घरात ३१ मे रोजी नुसरत महेमूद या महिलेचा मृतदेह आढळून आला. नुसरतने पतीच्या अनैतिक संबंधांची ऑडिओ क्लीप माहेरच्या लोकांना पाठवली. तसेच व्यवसायासाठी नुसरतचा पती एक लाखांची मागणी करत होता असा आरोप मयत महिलेच्या माहेरच्या नातवाईकांनी केला आहे.

नुसरत वेड्यासारखी करते असं म्हणत सासरच्या मंडळींनी तिला दर्ग्यात नेऊन तिच्या तोंडात लिंबू कोंबून तिला मारहाण केल्याचा आरोप देखील नुसरतच्या नातवाईकांनी केला. दोन महिन्यांपूर्वीच नुसरतचा विवाह झाला होता. विवाहानंतर एक महिना तिला चांगली वागणूक दिली. नंतर मात्र तिचा हुंड्यासाठी छळ सुरू झाला, अशी तक्रार हसनाबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

घरात नुसरतचा मृतदेह आढळून आल्यानंतर नंतर शवविच्छेदनसाठी हसनाबादमधीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. यावेळी नातेवाईकांनी गर्दी केल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर मयत महिलेच्या माहेरच्या नातवाईकांनी हसनाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मयत महिलेचा पती इम्रान महेमुद, सासू, सासरा, नणंद, नंदई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आला आहे. हसनाबाद पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Mumbai Monsoon 2022 : मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? पावसाचं स्वरुप कसं असेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here