मुंबई : राज्यात करोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. अशात सर्वच निर्बंध हटवले असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण या सगळ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये यामुळे खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी कुठलीही बंदी नसली तरीही नागरिकांनी आपली काळजी घेत मास्कचा वापर करावा असे आवाहन राजेश टोपे यांनी दिले आहे. रेल्वे, बस, सिनेमागृहांमध्ये मास्क घालणं अनिवार्य असून ट्रेन आणि शाळांमध्येही मास्कचा वापर करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Mumbai Covid Cases : मुंबईत २४ तासांत करोनाची ७६३ नवी प्रकरणं, ‘हे’ ठिकाण ठरलं हॉटस्पॉट
सहा जिल्ह्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आरोग्य मंत्र्यांकडून हे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबईत(Mumbai) करोनाने (Corona) पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी शहरात करोनाचे ७६३ नवे रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंता आहे. पण यावर कोणीही घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सतत वाढत असलेल्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, बीएमसी आयुक्त इक्बाल चहल यांनी ज्या इमारतींमध्ये संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत तिथ मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

अधिकार्‍यांना दिलेल्या माहितीनुसार, कोविड -१९ चाचण्यांची संख्या सध्याच्या आठ हजार चाचण्यांवरून ३०,००० पेक्षा जास्त करावी. सध्या संसर्गाचे प्रमाण आठ टक्क्यांवर पोहोचले आहे. जो धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे पालिका अलर्टमोडवर आहे. अशात नागरिकांनीही आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Mumbai Monsoon 2022 : मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? पावसाचं स्वरुप कसं असेल ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here