चंद्रपूर : राजुरा येथे मुख्य महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. मोनल मेश्राम असं अपघातात ठार झालेल्या महिला शिपायाचं नाव आहे. मेश्राम यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत महिला पोलीस मोनल या आपले कर्तव्य बजावून मायस्ट्रो दुचाकीने बल्लारपूर येथून राजुराकडे आपल्या राहत्या घरी परत येत होत्या. मात्र वाटेत मागून येणाऱ्या आयशर ट्रकने मोनल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक बसताच मोनल यांचा आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्या खाली कोसळल्या. या अपघातात मोनल यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पिंपरीत मध्यरात्री थरार: कारचोर आणि पोलिसांमध्ये चकमक; एका पोलिसावर चाकूने वार

दरम्यान, अपघाताची ही बातमी समजताच पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतक मोनल मेश्राम यांच्या पश्चात महावितरण विभागात कार्यरत पती विलास बनकर आणि दोन लहान मुले आहेत. मोनल यांच्या अकाली निधनाने त्यांची लहान मुले आईच्या मायेला मुकणार आहेत. या घटनेनंतर राजुरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सैनिकाच्या अकस्मात मृत्यूनं गावावर शोककळा, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here