नांदेड : नांदेड-देगलूर मार्गावरील शंकरनगर येथे कार आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाने उपचारादरम्यान प्राण सोडले. सुदैवाने या भीषण अपघातात एक गरोदर महिला बचावली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नरसीकडून देगलूरकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात बिलोली येथील शंकर जाधव, महानंदा जाधव आणि कल्पना शिंदे हे तिघे जागीच ठार झाले, तर धनराज जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान स्वाती शिंदे ही गरोदर महिला गंभीर जखमी असून शंकरनगर पोलिसांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

भीषण अपघातात महिला पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू; २ मुले आईच्या मायेला मुकणार

अपघात कसा झाला?

नायगाव तालुक्यातील टाकळी येथील जाधव कुटुंब शंकरनगरकडे जात होते. मात्र कुंचेली फाट्यावर या कुटुंबाच्या स्विफ्ट कारला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस पोहोचण्याआधीच तिघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर कारचालक गंभीर अवस्थेत होता. कार चालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. स्वाती शिंदे ही गरोदर महिला सध्या गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here