हिंगोली : देशात महिलांवरील अत्याचारास सोबतच लहान बालकांवरील देखील अत्याचारांच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यातच आता, हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील वरूड चक्रपान येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणाने शेजारी राहणाऱ्या ७ वर्षीय चिमुकलीला टिव्ही पाहण्यास बोलावत तिच्या सोबत गैर प्रकार केला आहे. सदरील बाब मुलीच्या आईच्या लक्षात येताच हे बिंग फुटले. मात्र, सदरील प्रकाराबाबत पिडित मुलीच्या आईने पिडीत मुलास विचारणा केली असता मुलीच्या आईला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिडित मुलगा फरार झाला आहे.
दिवसेंदिवस या अत्याचारांच्या घटनेच्या संख्येत घट होण्याऐवजी ती संख्या वाढतच चालली आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील विश्वासातील लोकांकडून ह्या अत्याचाराच्या घटना होत असल्याचे निदर्शनास दिसून येते. कधी जन्मदात्या पित्याकडून स्वतच्या मुलीवर, तर कुठे बहीण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना हल्लीच्या काळात घडू लागले आहेत.