हिंगोली : हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर कलगाव शिवारात भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ३ जून रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. विजय निवृत्ती धाबे वय ४५ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील गुलशर पठाण व विजय धाबे हे त्यांच्या दुचाकी वाहनावर शुक्रवारी ३ जून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बेलुरा येथे बांधकामासाठी जात होते. त्यांचे दुचाकी वाहन कलगाव शिवारात आल्यानंतर त्यांनी दुचाकी थांबवली. यावेळी विजय धाबे हे लघुशंकेसाठी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टर एमएच ३८ व्ही २७६० यांना जोराची धडक दिली. या अपघातात विजय गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला.

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या सभेला पोलिसांची परवानगी, १५ अटी-शर्ती
यावेळी गुलशर पठाण व इतर गावकऱ्यांनी गंभीर जखमी झालेल्या धाबे यांना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले. मात्र त्यांचा दु्र्दैवी रस्त्यातच मृत्यू झाला. या प्रकरणी गुलशर पठाण यांच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आर.एन. मळघने, उपनिरीक्षक एस.एम. मुपडे, जमादार अशोक धामणे,गजानन पोकळे,आकाश पंडीतकर पुढील तपास करीत आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे ठिकाण ठरलं, या मैदानात होईल WTC 2 चा महामुकाबला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here