मुंबई- देशावर आजवर झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या आठवणी मिटता मिटत नाहीत. या हल्ल्यांमध्ये ज्यांनी जीव गमावला त्यांचे कुटुंबीय आजही त्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. लोकांना वाचवत असताना अनेक वीर शहीद झाले. त्यापैकी एक मेजर संदीप उन्नीकृष्णन. संदीप यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात बलिदान दिले. त्यांच्या शौर्यावर बेतलेला मेजर हा सिनेमा रिलीज झाला.

या सिनेमाच्या खास स्क्रिनिंगच्यावेळी एक असा प्रसंग घडला की प्रत्यक्ष सिनेमातील भावुक सीनला मागे टाकत या दृश्याने पाहणाऱ्यांचेही डोळे पाणावले. संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता आदिवी शेष याने हा अनुभव त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘आश्रम ३’ मध्ये इंटिमेट सीन देताना ईशाच्या मनात होते कोणते विचार

२६ नोव्हेंबर २०११ मध्ये मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला उन्नीकृष्णन कुटुंबासाठी त्यांचा मुलगा हिरावून घेणारा ठरला. मेजर संदीप हे त्यावेळी ताज हॉटेलमध्ये ड्युटी बजावण्यासाठी गेले होते. सिक्युरिटी गार्डसचे कमांडो मेजर असलेल्या संदीप यांनी त्या दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता अनेक नागरिकांचे प्राण वाचवले तसेच सहकारी कमांडोंनाही सुरक्षित बाहेर काढले. मात्र या लढाईत संदीप यांना प्राणांची आहुती द्यावी लागली. संदीप यांच्या याच शौर्यावर बेतलेला मेजर हा सिनेमा रिलीज झाला आहे.

मेजर

मेजर सिनेमाचे खास स्क्रिनिंग ठेवले तेव्हा संदीपच्या आईवडिलांनाही बोलवण्यात आलं होतं. या सिनेमात मेजर संदीप यांची भूमिका तेलुगू अभिनेता आदिवी शेष याने केली आहे. जसा हा सिनेमा पडदयावर सुरू झाला तसे त्यातील एकेक सीन बघून संदीप यांच्या पालकांच्या डोळयात अश्रू आले. सिनेमातील संदीपची भूमिका बघून त्यांनी अभिनेता आदिवी शेष याला मिठीच मारली.

रियाला धक्का, कोर्टानं परवानगी देऊनही IIFA ला जाता येणार नाही

मेजर

या भेटीचा फोटो आदिवीने शेअर केला आहे. या फोटोसोबत आदिवीने असं लिहिलं आहे की, अंकल आणि अम्मा, हे सगळं मी तुम्हा दोघांसाठी केलं आहे. संदीप तुमच्या सोबत नसले तरी त्यांच्या आठवणी तुमच्या सोबत आहेत. त्यात माझ्याकडून मी काही वेळासाठी का होईना संदीपसोबत जगण्याचे क्षण तुम्हाला देऊ शकलो.

मेजर

आदिवी शेषसोबत या सिनेमातील कलाकार यावेळी उपस्थित होते. यामध्ये सुशांत अक्किनेनी, सई मांजरेकर, प्रकाश राज, रेवती, मुरली शर्मा, शोभिता धूलिपाला यांच्याही मुख्य भूमिका आहेत. आदिवी शेष यानेच हा सिनेमा लिहिला आहे तर अभिनेता महेश बाबू निर्माता आहे. हा सिनेमा तेलगू भाषेसह एकाच वेळी हिंदी आणि मल्याळम भाषेतही रिलीज झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here