मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ४ किंवा ५ जूनला राजस्थान, जम्मू विभाग, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिण पंजाब, दक्षिण हरियाणा आणि दिल्ली येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ४ किंवा ६ जूनच्या सुमारास विदर्भ, झारखंड, ओडिसा आणि छत्तीसगड आणि ४ किंवा ८ जूनच्या सुमारास दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेश उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यास सात दिवसांचा कालावधी लागतो. मान्सूनचा वेग कायम राहिल्यास ४ ते ५ जूनला तळकोकणात दाखल होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भाच्या काही भागात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी सोडून २० नेते भाजपात, सतेज पाटलांनी ‘सांभाळा’ म्हटलेले आमदार कोण?
मान्सूनच्या आगमनाचे सर्व निकष पूर्ण झाले आहेत. केरळमधील ६० टक्के पर्जन्यमापक केंद्रांवर पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षी मान्सून १ जूनला केरळमध्ये दाखल होतो. मान्सून १६ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला होता. हवामान विभागानं यंदा मान्सून वेळे अगोदर केरळमध्ये दाखल होईल, असं म्हटलं होतं. प्रमाणं मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील सहा ते सात दिवसांमध्ये तळकोकणात आणि महाराष्ट्रात दाखल होत असतो.

वय झाल्यानं जीभ घसरते, महंत परमहंस दास यांचा मोहन भागवत यांच्यावर पलटवार
यंदा वरुणाराजा वेळेआधी दाखल झाला आहे. हा वेग कायम राहिल्यास पुढील सात दिवसात महाराष्ट्रातील तळकोकणात मान्सून दाखल होऊ शकतो. ७ ते ८ जून पर्यंत मान्सून मुंबई किंवा पुण्यात दाखल होऊ शकतो.

Apps: प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या फोनमध्ये असायलाच हवे ‘हे’ ५ अ‍ॅप्स, मिनिटात होईल सरकारी काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here