भंडारा : स्वप्न बघण्याचा अधिकार सर्वांना असून काही जण दिवसा स्वप्नं बघत आहेत, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना लगावला आहे. भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल, या धनजंय मुंडे यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी उत्तर दिलं.
लोकशाहीत मुख्यमंत्री कोण बनेल, हे जनता ठरवत असते. त्यामुळे स्वप्न बघण्याचा सर्वांना अधिकार आहे, पण काही जण तर दिवसा स्वप्नं पाहात असतात, असा खोचक टोला नाना पटोले यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले होते?
येणाऱ्या काळात मुख्यमंत्री आपलाच असेल, असं वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं. साताऱ्यातील डिस्कळ येथील एका सभेत बोलताना त्यांनी हे भाकित व्यक्त केलं. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आले होते. पुढच्या वेळी सामाजिक न्याय मंत्री पदाचे खाते हे आपल्याकडेच असेल असं ते म्हणाले. पुढचा मुख्यमंत्री हा आपलाच असल्याचेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा :
नाना पटोलेंचा अजित पवारांनाही टोला
यावेळी नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केलेल्या भाषणाचाही समाचार घेतला आहे. आज अजित पवार पुण्यात एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना बाहेरचे लोक आपल्याला काय मदत करणार, असे म्हणाले होते. त्याबद्दल नाना पटोले यांना विचारले असता ते कोणत्या उद्देशाने बोलले मला माहित नाही. मात्र त्यांच्या स्वतःचा राज्यसभा उमेदवार गुजराती आहे. त्यामुळे त्यांचा एकदा उद्देश कळला, की वक्तव्य करता येईल, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
हेही वाचा : सामाजिक न्याय मंत्री पद आपल्याकडेच असेल कारण मुख्यमंत्री आपलाच असेल | धनंजय मुंडे
सामाजिक न्याय मंत्री पद आपल्याकडेच असेल कारण मुख्यमंत्री आपलाच असेल | धनंजय मुंडे